टांगा शर्यतीची परंपरा नगरकर जपत आहेत - संग्राम जगताप
अ-प्राईड वेब न्यूज टीम : घोडागाडी, टांगा गाडी, बैलगाडी शर्यत यांना मोठी परंपरा आहे. ही परंपरा संघटना जपत आहेत. स्पर्धेतील हार जीत महत्त्वाची नसून यातून मिळणारा सन्मान महत्त्वाचा आहे. मध्यंतरी या स्पर्धांवर कोर्टाने बंदी घातली होती. मात्र ती उठवण्यात आल्यामुळे आयोजकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्पर्धेच्या आयोजनासाठी रुबाब उद्योग समूहाने घेतलेला पुढाकार हा स्पर्धकांना प्रोत्साहन देणारा असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले आहे.
रुबाब उद्योग समूह आणि अहमदनगर घोडा - टांगा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शर्यतीचा बक्षीस वितरण समारंभ आ.जगताप यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. स्पर्धेत खुल्या गटातून सोनू बोरुडे यांना स्प्लेंडर दुचाकी बक्षीस म्हणून यावेळी प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल देण्यात आली. तर कुमार गटात मुन्ना बारस्कर यांनी भव्य ट्रॉफी पटकावली.
यावेळी माजी नगरसेवक किशोर डागवाले, निखिल वारे, दगडूमामा पवार, रुबाब उद्योग समूहाचे सनी जाधव, मनोज लोंढे, श्याम लोंढे, अक्षय जाधव आदींसह टांगा शर्यत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments