Subscribe Us

Header Ads

Breaking News - अनिस चुडीवाला यांची निवडणूक रिंगणातून माघार, निवडणुक प्रक्रिया झाल्यास गुंदेचा - घैसास पॅनलचा प्रचार करणार

 

Breaking News - अनिस चुडीवाला यांची निवडणूक रिंगणातून माघार, निवडणुक प्रक्रिया झाल्यास गुंदेचा - घैसास पॅनलचा प्रचार करणार

अ-नगर प्राईड वेब न्यूज टीम : शहर सहकारी बँक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गुंदेचा - घैसास पॅनलच्या वतीने पॅनलचे नेते गिरीश घैसास यांच्या विनंतीवरून आणि माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या सूचनेवरून मी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असल्याचे अनिस शकूर चुडीवाला यांनी जाहीर केले आहे. 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे निवडणूक प्रक्रिया पार पडणार असे दिसते आहे. बँकेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने मी माघार घेतलेली असल्यामुळे, निवडणूक प्रक्रिया होणारच असेल तर गुंदेचा - घैसास पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची माझी भूमिका असणार आहे, असे चुडीवाला यांनी स्पष्ट केले आहे. 

बँक आधीच तोट्यात आहे. त्यामुळे निवडणूक होऊ नये असा प्रयत्न पॅनलच्या नेत्यांचा होता. माझीही तीच भुमिका होती. पॅनलच्या विनंतीला मान देत मी विहित नमुन्यात माघारीचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. मात्र वेळ संपल्याचे कारण देत त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. 

त्यांची ही भूमिका आडमुठेपणाची असून सहकारातील निवडणूक असल्याने आणि बँक आधीच तोट्यात असल्याने त्यांनी माघारीसाठीचा अर्ज स्वीकारायला हवा होता. यापूर्वी देखील अनेक सहकाराच्या निवडणुकांमध्ये निवडणूक खर्च टाळण्यासाठी माघारीचा अर्ज स्वीकारण्याची मुदत ही वाढवण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र यावेळी तसे घडले नाही. ही निश्चितच व्यवहारिकदृष्ट्या योग्य बाब नसल्याचे चुडीवाला यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments