भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची गुंडगिरी.. दिवंगत खासदारांच्या मुलाला दिली धमकी.. ऑडिओ क्लिप व्हायरल.. जैन समाजातून नाराजीची भावना..
अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी स्वपक्षाच्याच असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांना फोनवरून धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमुळे समाज माध्यमांवर कर्डिले यांच्या गुंडगिरीची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
कर्डिले यांच्यावर यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. केडगाव दुहेरी हत्याकांडात देखील त्यांच्या नावाने फिर्याद दाखल झाली होती. कर्डिले हे स्वतः बडे प्रस्थ असून अहमदनगर शहराचे बडे प्रस्थ असणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांचे सासरे आणि विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे व्याही आहेत.
आता कर्डिले यांनी सुवेंद्र गांधी यांना Adv. अभिषेक भगत यांच्या संदर्भाने दिलेल्या धमकीमुळे समाज माध्यमांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. गांधी यांना देण्यात आलेला धमकीमुळे जैन समाजातून नाराजीची भावना व्यक्त केली जात आहे. याबाबत अद्याप गुन्हा दाखल झाला आहे की नाही याबाबतची माहिती समोर येऊ शकलेली नाही.
ऑडिओ क्लिप ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
0 Comments