माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांची जेष्ठ पत्रकार स्व. महेंद्र कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेट
अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : ज्येष्ठ पत्रकार स्व. महेंद्र कुलकर्णी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा विशेष ठसा निर्माण केला होता. राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी शोकाकुल कुलकर्णी कुटुंबीयांची त्यांच्या नगर येथील निवासस्थानी भेट घेत सांत्वन केले.यावेळी आ. थोरात यांनी स्व. कुलकर्णी यांच्या समवेतच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी स्व. महेंद्र कुलकर्णी यांच्या पत्नी, मुली, बंधू सीए ज्ञानेश कुलकर्णी, कुटुंबीय उपस्थित होते. आ.थोरात आणि स्व. कुलकर्णी यांची चांगली मैत्री होती. कुलकर्णी यांच्या अचानक जाण्याने दुःख झाल्याची भावना यावेळी थोरात यांनी व्यक्त केली.
स्व.कुलकर्णी यांच्या स्मृती कायम जपल्या जाव्यात यासाठी त्यांनी लिहिलेल्या विशेष लेखांचे पुस्तकरुपी प्रकाशन व्हावे, अशी कल्पना यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधताना आ. थोरात यांनी मांडली. निर्भीड आणि स्पष्ट पत्रकारिता हे स्व. कुलकर्णी यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य होते अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे नेते अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, जिल्हा परिषद गटनेते अजय फटांगरे, सचिन चौगुले, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के, दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके, दैनिक सार्वमत संपादक अनंत पाटील, दैनिक पुढारीचे संपादक संदीप रोडे, न्यूज १८ लोकमतचे साहेबराव कोकने, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कासवा, चैतन्य ट्रॅव्हल्सचे संचालक किशोर मरकड, भाजपचे सचिन पारखी, पीआरओ नामदेव काहांडळ आदींसह कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.
0 Comments