Subscribe Us

Header Ads

उड्डाणपुलावर ट्राफिक जाम


उड्डाणपुलावर ट्राफिक जाम

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : रविवार सुट्टीचा दिवस. मात्र या दिवशी सायंकाळी उशिरा नगरच्या नुकत्याच उद्घाटन झालेल्या उड्डाणपुलावर ट्राफिक जाम झालेले पाहायला मिळाले. वाहनांच्या लांबच लांब रांगा उड्डाणपुलाच्या शेवटच्या टोकापर्यंत दिसत होत्या. 

कानेटिक चौकात ट्राफिक जाम झाल्यामुळे लागलेल्या वाहनांच्या रांगा बराच काळ ट्राफिक जाम न सुटल्यामुळे उड्डाणपुलावर रेंगाळल्या.

उड्डाणपूलामुळे औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या आणि पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनांची चांगलीच सोय झाली आहे. 

मात्र कायनेटिक चौकात रेल्वे माल धक्क्यावरून येणाऱ्या गाड्यांच्या रांगा लागल्यामुळे आणि त्यातच दौंड रोड आणि पुण्याकडून येणाऱ्या मार्गावरील गाड्यांची संख्या मोठी असल्यामुळे कायनेटिक चौकात मोठे ट्राफिक जाम झाले होते. परिणामी उड्डाणपुलावर देखील ट्राफिक जाम झाले होते. 

Post a Comment

0 Comments