Breaking : राहुल गांधींवर टीका युवक काँग्रेस खपवून घेणार नाही - युवक शहराध्यक्ष प्रवीण गीते
गांधींवर टीका करणाऱ्या आ. तांबेंचा फ्लेक्सवर फोटो टाकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तांबेंच्या कार्यकर्त्यांनी जाणून-बुजून गोंधळ घातल्याचा केला आरोप
प्रतिनिधी : खा. राहुल गांधी हे आमचे नेते आहेत. जीवाची पर्वा न करता ते पक्ष बांधणीसाठी रक्ताचे पाणी करत आहेत. मात्र विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी गद्दारी करणाऱ्या अपक्ष आ. सत्यजित तांबेंनी दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधींना भाजपवर टीका न करण्याचा अजब सल्ला दिला होता. त्यावरून त्यांन सोशल मीडियात प्रचंड प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्ते ट्रोल करत आहेत. त्याच तांबेंचा फोटो युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या स्वागत फलकावर टाकल्याचा जाब विचारल्याने काहींचा पोटशुळ उठला. यावरुन तथाकथित तांबे समर्थकांनी बैठकीत गोंधळ घातला. राहुल गांधींवर टीका करणारे आ. तांबे आणि अशांची तळी उचलणारे त्यांचे तथाकथित कार्यकर्ते यांचा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत असल्याचे नगर शहर ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते यांनी म्हटले आहे.
गीते म्हणाले की, भाजप हा काँग्रेसचाच नाही तर देशाचा शत्रू आहे. त्यांच्या विरोधात राहुल गांधींसह देशातील काँग्रेस कार्यकर्ते जनतेच्या हक्कांची लढाई लढत आहेत. पदवीधर निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जात भाजपाची मदत घेऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या विरोधाची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांचाच फोटो त्यांच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी युवक प्रदेशाध्यक्षांच्या स्वागत फलकावर टाकला. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. जे राहुलजींना देखील सोडत नाहीत, काँग्रेस पक्षावर टीका करतात, काँग्रेस पक्षाच्या विरोधात कृत्य करतात, अशांना युवक काँग्रेस अजिबात थारा देणार नाही.
Video
आम्ही युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याचाच जाब बैठकीत संबंधित तथाकथित कार्यकर्त्यांना विचारला. याचा त्यांना राग आला. त्यांचा तोल सुटला. त्यांनी गोंधळ घातला. प्रदेशाध्यक्षांचा अवमान केला. पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवाराचे इमाने इतबारे पक्षाच्या आदेशावरून काम करणाऱ्या जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या विरोधात देखील या मंडळींनी घोषणाबाजी केली. त्याला पक्षाच्या निष्ठावान युवक कार्यकर्त्यांनी चोख प्रतिउत्तर दिले. त्यांनतर तथाकथित तांबे समर्थकांनी तिथून घाबरून पळ काढला.
राहुल गांधींना अक्कल शिकू पाहणाऱ्या अक्कलशून्य तांबेंचा आम्ही निषेध करतोच. मात्र काँग्रेस पक्षामध्ये राहून भाजपची तळी उचलत तांबेंचा उदो उदो करणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांना इथून पुढे देखिल असेच चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा नगर शहर ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, युवक शहर जिल्हा सरचिटणीस सुरज गुंजाळ, शहर जिल्हा सरचिटणीस वैष्णवी तरटे, युवक काँग्रेस नगर तालुकाध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, युवक उपाध्यक्ष आकाश आल्हाट, सरचिटणीस गौरव घोरपडे, सचिव विनोद दिवटे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष ऋतिक जाधव, युवक सरचिटणीस आनंद जवंजाळ आदींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
0 Comments