काँग्रेस नेते राहुल गांधीं वरील कारवाईचे नगरमध्ये उमटले तीव्र पडसाद
प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधींवर संसदेच्या सचिवालयाने तडकाफडकी सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केल्यानंतर त्याचे नगरमध्ये तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. भाजप, आरएसएस हटाव, लोकशाही बचावचा नारा देत समविचारी पक्षांनी रस्त्यावर उतरत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काळया फिती बांधून लोकशाही बचाव सत्याग्रह केला आहे.
पहिल्यांदाच शहर काँग्रेस सह शहर शिवसेना उद्धव ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, नगर तालुका काँग्रेस, तालुका राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गट, सैनिक समाज पार्टी, ऑल इंडिया युथ फेडरेशनसह सामाजिक, राजकीय चळवळीतील विविध घटक, गट, समूहांचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे राजकारणाशी निगडीत नसणाऱ्या नागरिकांनी देखील या सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला. सुरुवातीला महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यावेळी दंडाला कळ्या फिती बांधून मोदी सरकारच्या निषेध करण्यात आला.
यावेळी वक्त्यांनी आक्रमक भाषणे केली. हिंडेनबर्गने आदानी उद्योग समूहावर केलेल्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. देशाच्या पंतप्रधानांचे आणि उद्योगपती अदानींचे नेमके संबंध काय ? हा प्रश्न विचारण्यात आला. षडयंत्र रचून राहुल गांधींवर कारवाई सुरूबुद्धीने कारवाई केली गेली.
गांधींचा संसदेत घुमणारा निर्भीड आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर संबंध भाजप तुटून पडली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी सत्याग्रहींच्या हातामध्ये अदानींच्या खाजगी विमानातील देशाच्या पंतप्रधानांचा राहुल गांधींनी संसदेत दाखवलेला फोटो सत्याग्रहींच्या हातामध्ये झळकत होते.
शहर राष्ट्रवादीसह आमदारांना निमंत्रण नाही
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी असली तरी नगर शहरातील राष्ट्रवादीसह आमदारांना निमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. शहराच्या आमदारांचा भाजपच्या खासदारां समवेत असणारा जाहीर वावर, तसेच भाजप प्रणित संघटनांच्या कार्यक्रमांना असणारी जाहीर उपस्थिती यामुळे त्यांना टाळण्यात आल्याची कुजबूज सत्याग्रहस्थळी कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.
यावेळी किरण काळे, शशिकांत गाडे, संजय झिंजे, संभाजी कदम, प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, रोहिदास कर्डिले, प्रताप पाटील शेळके, संपतराव म्हस्के, अरुण म्हस्के, रोहिदास कर्डिले, बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, उद्धवराव दुसुंगे, शरद झोडगे, प्रकाश पोटे, केशव बेरड, कॉ. सुभाष लांडे, कॉ. बन्सी सातपुते, कॉ. भैरवनाथ वाकळे, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संदीप दातरंगे, अर्शद शेख, अनिस चुडीवाला, अलतमश जरीवाला, भरत सकाळ, शाकीर शेख, रवी सातपुते, शिवाजीराव भोसले, अन्वर सय्यद, फिरोज शेख, शिवाजीराव साळवे, मुबिन शेख, विकास भिंगारदिवे, मंगल भुजबळ, आर. आर. पाटील, शिवाजी लोंढे, अरुण म्हस्के, मनसुख संचेती, ॲड. शिवाजी डमाळे, डॉ. श्रीधर दरेकर, प्रवीण गीते, गणेश चव्हाण, शैला लांडे, पुनम वंनंम, कॉ. मेहबूब सय्यद, दिलीप घुले, राजेंद्र कर्डिले, ॲड. विद्या जाधव, भरत बोडखे, बाळासाहेब देशमुख, विजयराव शिंदे, राजू देठे, विशाल केदारी, विजय सौदे, नाथा आल्हाट, शंकर आव्हाड, आकाश आल्हाट, हनीफ मोहम्मद शेख, राहुल सावंत, जरीना पठाण, सोफियान रंगरेज, मयूर भिंगारदिवे, अमन लोखंडे, करण भिंगारदिवे, ॲड. मंगेश काळे, विश्वनाथ निर्वाण, अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन अन्वर सय्यद यांनी केले. राष्ट्रगीताने सत्याग्रहाची सांगता करण्यात आली.
0 Comments