Subscribe Us

Header Ads

नगर शहर काँग्रेस सामाजिक न्याय युवा विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रणव मकासरेंची निवड


लवकरच शहर कार्यकारिणी गठित करणार, नवोदित युवा चेहरांना संधी देणार

प्रतिनिधी : युवक काँग्रेसचे प्रणव मकासरे यांची अहमदनगर शहर काँग्रेस सामाजिक न्याय युवा विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र मकासरे यांना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. नुकतीच शहरातील युवकांची व्यवसाय, रोजगार व स्वयंरोजगारा संदर्भात काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. 

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, नगर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, युवक उपाध्यक्ष आकाशभाऊ अल्हाट यांची प्रमुख उपस्थिती होती. मकासरे यांनी विद्यार्थी चळवळीत काम केले आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून ते शहरात मागील दोन वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांचे उत्तम संघटन कौशल्य पाहता त्यांना बढती देत सामाजिक न्याय काँग्रेस युवा विभागाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. 

अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे हे प्रणव मकासरे यांना नगर शहर काँग्रेस सामाजिक न्याय युवा विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र प्रदान करताना. समवेत ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, नगर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, युवक उपाध्यक्ष आकाशभाऊ अल्हाट.

किरण काळे म्हणाले की, 

शहराची एमआयडीसी छोटी आहे. काही अपवाद वगळता कोणतीही मोठी कंपनी नाही. त्यामुळे रोजगाराच्या अल्प संधी आहेत. विकासाच्या दृष्टीने शहराला उद्योग नगरी बनविण्याचे काँग्रेसचे ध्येय आहे. यासाठी वेळ लागणार आहे. मात्र शहरातल्या तरुणाईचा रोजगाराचा प्रश्न आजमितीस गंभीर आहे. नोकरीच्या संधी जरी अल्प असल्या तरी देखील व्यवसाय, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून युवकांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी काँग्रेस काम करत आहे. 

लवकरच कार्यकारिणी करणार 

युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश अल्हाट म्हणाले, शहरातील युवकांच्या हातात लाठा, काठ्या देण्याऐवजी रोजगार, स्वयंरोजगार देण्याची आमची भूमिका आहे. नियुक्तीनंतर मकासारे म्हणाले की, तरुणांमध्ये मोठी ऊर्जा आहे. मात्र अनेक तरुण सध्या आयपीएल, बिंगो, खाजगी सावकार, सट्टा याच्या विळख्यात अडकले आहेत. सामाजिक न्याय युवा विभागाच्या माध्यमातून किरण काळेंच्या नेतृत्वाखाली युवकांना चांगल्या मार्गावर स्वतःचे आयुष्य घडवण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. लवकरच युवा विभागाची शहर कार्यकारिणी गठित केली जाईल. 

बैठकीस हर्षल उजागरे, आनंद जवंजाळ, सचिन वाघमारे, दीपक कांबळे, राजू क्षेत्रे, सुरेश घोडके, बीभिषण चव्हाण, समीर सय्यद, कुणाल उजागरे, आकाश पाटोळे, भीमा रनसिंग, योगेश दाभाडे, किरण सोनवणे, संतोष निकाळजे, लखन घोरपडे, देव अल्हाट, अजय रणसिंग, अक्षय साळवे, अबू डोळस, राकेश पवार, वैभव दिवटे, सुदर्शन पवार, लखन दिवटे, ओमकार शिंदे, भोरू वाल्हेकर, विपुल साळवे, ऋषिकेश कुऱ्हाडे , सनी चव्हाण, शशिकांत आल्हाट, सागर नेटके, अक्षय घाडगे, विशाल मकासरे, ओमकार काळे आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





Post a Comment

0 Comments