Subscribe Us

Header Ads

किरण काळे काँग्रेस कार्यकर्त्यांसह आयोध्येला जाणार... प्रभू श्रीरामांची काँग्रेसकडून आरती


प्रभू श्रीरामांची काँग्रेसकडून आरती  

प्रतिनिधी : प्रभू श्रीरामां बद्दल केवळ भारतीयांमध्येच नव्हे तर जगभरात आस्था आहे. कोट्यावधी लोक श्रीरामांचे भक्त आहेत. अयोध्येमध्ये जाऊन रामलल्लांचे दर्शन घेणे ही एक अद्भुत अनुभूती आहे. मंदिराचे काम देखील प्रगतीपथावर आहे. लवकरच हे काम देखील पूर्ण होईल. अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी आणि शहर काँग्रेस कार्यकर्ते लवकरच अयोध्येला जाणार आहोत. 

तोपर्यंत मंदिराचे काम देखिल पूर्ण झालेले असेल. मंदिर पाहण्याचा यानिमित्ताने आनंद अनुभवता येईल, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. प्रभू श्रीरामांच्या आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या निमित्ताने शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी मनपाची माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, अपंग काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेज, राजू साळवे, इंजिनिअर सुजित क्षेत्रे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. 

किरण काळे म्हणाले, 

राम भक्ती हा भक्तांच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. प्रभू श्रीरामांना १४ वर्षांचा वनवास भोगाव लागला होता. आज महागाई, तरुणाईतील बेरोजगारी, व्यापारी, उद्योजकांचे मोडलेले कंबरडे, नोकरदार वर्गाचे प्रलंबित असणारे प्रश्न, गॅस, पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर याने भारतीय नागरिक त्रस्त आहेत. जे लोक हिंदुत्वाचे बेगडी प्रेम दाखवत आज सत्तेत बसले आहेत ते या देशातल्या तमाम हिंदू माता, भगिनी, बांधवांना आणि अन्य नागरीकांना या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कोणताही दिलासा देऊ शकलेले नाहीत. 

आज आरती करताना प्रभू श्रीरामांना हेच साकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातले आहे की जोवर सत्ता आजच्या सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे तोपर्यंत का होईना चांगल्या पद्धतीने ती चालविण्याची सद्बुद्धी त्यांना द्यावी. महागाई, बेरोजगारी, वाढलेले दर यातून सर्व सामान्य माणसाला दिलासा द्यावा. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालतो. प्रभू श्रीराम हे वंदनीय आहेत. या देशातील प्रत्येक नागरिकाने सर्व धर्मीयांना एकमेका विषयी प्रेमाची, आपुलकीची भावना बाळगून सर्वांना बरोबर घेत देशाला प्रगतीपथावर घेऊन गेले पाहिजे, हाच काँग्रेसचा विचार आहे असे काळे म्हणाले. 

मुस्लिम, ख्रिश्चन कार्यकर्त्यांची उपस्थिती 

काँग्रेसच्या वतीने आयोजित प्रभू श्रीरामांच्या आरती कार्यक्रमाला नगर शहरातील काँग्रेसचे मुस्लिम, ख्रिश्चन कार्यकर्ते देखील आवर्जून सहभागी झाले होते. अनेक हिंदू बांधव दर्ग्यामध्ये, चर्चमध्ये भेट देत असतात. एकमेकांच्या सणांच्या एकमेकांना शुभेच्छा देत असतात. हिंदू धर्मियां व्यतिरिक्त अन्य धर्मीय देखील मंदिरांना भेटी देत असतात. हीच या देशाची विविधतेने नटलेली एकता आहे. म्हणुनच भारत हा सुंदर देश आहे. अशी भावना यावेळी सर्व धर्मीय उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केली. 

Post a Comment

0 Comments