ब्रेकिंग न्यूज : अभिषेक कळमकर यांच्या उमेदवारीला शहर शिवसेनेचा विरोध.. शिवसैनिक सामुहिक राजीनामे देणार
विक्रम अनिलभैय्या राठोड, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर यांचा आक्रमक पवित्रा
नगर -राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी अभिषेक कळमकर यांना जाहीर झाली आहे. यानंतर शिवसेनेतून मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. नगरशहर विधान सभा मतदार संघाची जागा शिवसेनेला देण्यात यावी, अन्यथा एकमुखी सर्व पदाधिकारी सामुहिक राजीनामे देतील. नगरशहर विधानसभा मतदार संघाची जागा हि गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. सध्या निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने आता अखेरचे दोनच दिवस अर्ज भरण्यासाठी शिल्लक असल्याने अजूनही महाविकास आघाडीकडून नगरच्या जागेबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्यांसह सर्व नगरसेवक, शिवसैनिक अजून ही आशा पल्लवीत ठेवुन आहेत. नुकतीच नेता सुभाष चौकातील शिवालय येथे सर्व पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पदाधिकार्यांनी आपल्या भावना तीव्र व्यक्त केल्या.
यावेळी या बैठकीमध्ये शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, अनिल बोरुडे, प्रशांत गायकवाड, शाम नळकांडे, सचिन शिंदे, दिपक खैरे, परेश लोखंडे, अमोल येवले, हर्षवर्धन कोतकर, अशोक दहीफळे, सुरेश तिवारी, आशा निंबाळकर, अरुणा गोयल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून शहर मतदार संघ हा शिवसेनेकडे आहे. आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार याठिकाणी विजयी झाले. त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी जिवाचे रान केले होते. परंतु विधानसभेच्या वेळेस मात्र अजुनही शिवसेनेकडून कोणत्याच उमेदवारांची घोषणा केलेली नाही. यामुळे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सुर पसरलेला आहे. जर येत्या दोन दिवसामध्ये उमेदवारी जाहीर न झाल्यास सर्व पदाधिकारी सामुहिक राजीनामे देतील, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी विक्रम राठोड म्हणाले की, शिवसेनेवेर विश्वास ठेवणारा शिवसैनिक मोठ्या प्रमाणात नगरशहरात आहेत. अनेक वर्षापासून शिवसेनेबरोबर नगरशहरातील मतदार ठामपणे उभे आहेत. त्यामुळे जर हि विधानसभेचे जागा शिवसेनेला दिली नाही तर नगरशहरातील शिवसैनिक नाराज होणार आहेत. पक्षासाठी शिवसैनिक दिवसरात्र काम करत आहेत. वरीष्ठांनी योग्य तो निर्णय घेवुन शिवसैनिकांची नाराजी दूर करावी, विधानसभेची जागा शिवसेनेकडे ठेवुन लवकरच उमेदवार जाहिर करावा, असे म्हणाले.
यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले की, शिवसेनेने नगरशहरात भरीव विकासकामे केली आहेत. नगरमध्ये सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शहरात शिवसेनेबरोबरच मोठा मतदार जोडलेला आहेत. विधानसेभेची जागा मिळाली, तर नक्कीच आपला उमेदवार विजयी होईल. असे ते म्हणाले.
यावेळी पप्पु भाले, संदिप दातरंगे, संजय आव्हाड, मुन्ना भिंगारदिवे, अरुण झेंडे, सुनिल त्रिपाठी, प्रशांत गडाख, विशाल वालकर, अभिजित अष्टेकर, बंटी खैरे, कैलास शिंदे, अंबादास शिंदे, जेम्स अल्हाट, ऋषि सामल आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments